Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कोयत्याने वार; सुदैवाने कोणीही जखमी नाही

कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून उगारला कोयता

एमपीसी न्यूज : काल दि.(9 मे) रोजी दुपारी साडेचार वाजता पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन गटात क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्यामुळे एका गटातील  तरुणांनी(Pimpri-Chinchwad)  त्यांच्याकडे असलेला कोयता उगारला. सुदैवाने यात कुठलाही विद्यार्थी जखमी झाला नाही.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की,पिंपरी-चिंचवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हा प्रकार घडला आहे. काल दि.(9 मे) रोजी अभियांत्रिकीचा पेपर सुरू होता. नेहमीप्रमाणे विद्यार्थी पेपर देऊन घरी जात होते. यावेळी यातील काही तरुण महाविद्यालयाच्या आवारामध्ये बसून मोठ्या आवाजात फोनवर संभाषण करत होते. दरम्यान,त्या विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांकडे बघितल्यामुळे तसंच फोनवर मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद(Pimpri-Chinchwad) झाला.

त्यांच्यामधील वाद एवढा विकोपाला गेला की, यातील एका गटाच्या तरुणांनी थेट त्यांच्याकडे असलेला कोयता उगारला. कोयता उगारताच महाविद्यालयातील परिसरात असलेले विद्यार्थी  जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत होते.सुदैवाने यात कुठलाही विद्यार्थी जखमी झालेला नाही.

या संपूर्ण प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Chinchwad: भर दिवसा कोयता घेऊन फिरणाऱ्यास बेड्या

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.