Pune : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुण्यातील अनेक भागांत झाडे पडल्याचे निदर्शनास

पुणे अग्निशमन विभागाकडे गुरुवारी 21 ठिकाणी झाडे पडल्याच्या नोंदी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात गुरुवारी (दि. 9) दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही ठिकाणी वाहनांवर झाडे पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. पुणे अग्निशमन विभागाकडे गुरुवारी 21 ठिकाणी झाडे पडल्याच्या नोंदी झाल्या. एकाच दिवसात 21 ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे अग्निशमन दलाच्या(Pune) जवानांची चांगलीच धावपळ उडाली.

आज दुपारी साडेतीन वाजता सहकारनगर येथील सारंग सोसायटीमध्ये  झाड पडल्याचा पहिला कॉल अग्निशमन विभागाला आला. त्यानंतर कात्रज शेलार मळा, सातारा रोड येथील पद्मावती मंदिर, सिहंगड रोडवरील हेलिऑन शाळेजवळ, मॉडल कॉलनी(शिवाजीनगर), महात्मा सोसायटी(कोथरुड), कर्वेनगर शारदा निकेतन मुलींचे वसतिगृह, कोथरुड, डिपी रोड-5 ठिकाणी चारचाकी वाहनांवर झाडे पडल्याचे(Pune) समजले आहे.

                   

तसेच, शिवणे, दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट, कोरेगांव पार्क, विद्युत नगर सोसायटी, जैन मंदिरजवळ(भवानी पेठ),  हॉटेल वैशाली मागे(एफसी रोड), एरंडवणा येथील सेवासदन शाळेजवळील चारचाकी वाहनावर झाड पडले. याव्यतिरिक्त  टिंगरे नगर येथील साईबाबा मंदिराजवळ, पाषाण सुस रोड,  नामदेव नगर(वडगाव शेरी), कोथरुडमधील  तेजसनगर ,राहुल नगर,डहाणूकर कॉलनी, सेनापती बापट रोड, नाना पेठ पोलिस चौकीसमोर झाडे पडल्याचे निदर्शनास आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.