Pimpri : गंमत-जंमत केल्यास बंदोबस्त करेल; अजित पवार यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- (Pimpri)मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना माझा पाठींबा पूर्णपणे आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, महायुतीचे प्रामाणिकपणे काम करायचे आहे.

गंमत-जंमत केल्यास बंदोबस्त करेल असा इशारा उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pimpri)अध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. आपल्याला सोडून गेलेल्याना माझा पाठींबा नाही.आपली साथ सोडली, त्यांना लखलाभ असेही ते म्हणाले.

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कोयत्याने वार; सुदैवाने कोणीही जखमी नाही

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची पिंपरीत सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. उमेदवार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, सदाशिव खाडे, चंद्रकांता सोनकांबळे माजी नगरसेवक, तिन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी मिळणार आहे. निगडी पर्यंत मेट्रोचे काम सुरू झाले. मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आणले जाणार आहे. भामा असखेड, आंध्र धरणातून पाणी आणले आहे. रिंगरोडसह विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. देहूगाव, चाकण पर्यंत मेट्रो नेली जाणार आहे.

विराेधकांकडे काेणताच मुद्दा नाही. वाटेल ते बाेलत आहेत. तुम्ही काय करणार ते बाेलत नाही. खासदार बारणे लाेकसभेत बाेलतात. प्रश्न मार्गी लावत असून निधी आणत आहेत. मावळळमध्ये विकासाची अनेक कामे करायची आहेत. म्हणून महायुतीचा खासदार निवडून आला पाहिजे. पिंपरी-चिंचवडमध्ये 25 वर्ष मी म्हणेल ताे नगरसेवक निवडून यायचा. गावकी भावकीचा भेद न करता पदे दिली. शहराचा नियाेजनबध्द विकास केला. जगाच्या नकाशावर पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण केली, असेही पवार म्हणाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.