Today’s Horoscope 10 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 10 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 10.05.2024.

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – अक्षय्य तृतीया.

राहू काळ – सकाळी 10.30  ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – रोहिणी 10.47  पर्यंत नंतर मृग. 

चंद्र राशी – वृषभ 22.26 पर्यंत नंतर मिथुन.

—————————–

मेष  ( शुभ रंग- राखाडी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)

आज तुमचं मनोबल उत्तम असून तुमची सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. आज तुम्ही रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीला प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल.

मिथुन (शुभ रंग – पिस्ता)

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भववेल की जो तुम्हाला टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

कर्क ( शुभ रंग- निळा)

कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. काही खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. संततीचे विवाह योग जुळून येतील.

सिंह ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

कन्या (शुभ रंग- क्रीम)

दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हमखास यश मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. मन प्रसन्न राहील.

तूळ (शुभ रंग- आकाशी)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हातचे सोडून पळत्या मागे जाणे योग्य ठरणार नाही. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. आज ताकही फुंकूनच प्यावे असा दिवस.

वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

धनु (शुभ रंग- डाळिंबी)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती मात्र वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मकर (शुभ रंग- जांभळा)

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वतःचे मनसोक्त लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील.

कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)

कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा तुमचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

मीन (शुभ रंग- सोनेरी)

शेजाऱ्यांशी काही क्षुल्लक कारणांनी झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आज क्रोधावर लगाम गरजेचा राहील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.