Chinchwad: भर दिवसा कोयता घेऊन फिरणाऱ्यास बेड्या

एमपीसी न्यूज – भर दिवसा कोयता घेऊन फिरणाऱ्या एका (Chinchwad)तरुणाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास साई साठे पार्क, चिंचवड येथे करण्यात आली.

अमर सुनील वाघमारे (वय 23, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उमेश मोहिते यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : शहरात स्वतंत्र उद्योगभवन उभारण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनगर माध्यमिक विद्यालयाच्या(Chinchwad) पाठीमागे साई साठे पार्क हाऊसिंग सोसायटीच्या मोकळ्या जागेत एकजण कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अमर वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 500 रुपये किमतीचा एक कोयता जप्त केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.