Pimpri : पिंपरी मतदारसंघाचे व्होटर स्लीपचे वाटप प्रगतीपथावर

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान 13 मे रोजी होणार असून पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे 3,73, 448 मतदारांपर्यंत  येत्या आठवड्याभरात(Pimpri) व्होटर स्लीप ( मतदार चिठ्ठी ) पोहचविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अंतिम झाल्यामुळे व्होटर स्लीप ( मतदार चिठ्ठी ) वाटप सुरु करण्यात आलेले आहे. पिंपरी मतदारसंघांतर्गत  400 मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार व्होटर स्लीपचे वाटप करण्यासाठी 400 बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नेमणूक करण्यात आलेली असून बीएलओ घरोघरी जाऊन व्होटर स्लीपचे वाटप करीत आहेत.

तसेच क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधून व्होटर स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त मनपाच्या 8 क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार मदत केंद्र चालू करण्यात आलेले आहेत. सहकारी उपनिबंधक कार्यालय, पुणे -3 यांचे सहकार्याने मतदार संघातील सहकारी गृहरचना सोसायट्यांमध्ये व्होटर स्लीप वाटपाचे कामकाज करण्यात येत आहे.

Pimpri : पिंपरी येथे मतदानासाठी मतदान यंत्रे तयार करण्याचे काम सुरू

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मुदतीमध्ये  व्होटर स्लीप वाटपाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविणेकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील कलावंत, खेळाडू, उद्योजक, शासकीय अधिकारी यांनी मतदान करण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून सिनेनाट्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुष्टियोद्धा राजदूत  गोपाल देवांग ,पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल  यांचे घरी समक्ष(पिंपरी) व्होटर स्लीपचे वाटप करण्यात आलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.