Pimpri : पिंपरी येथे मतदानासाठी मतदान यंत्रे तयार करण्याचे काम सुरू

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्याअनुशंगाने पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयाकडून मतदानकेंद्र निहाय मतदान यंत्रे (EVM व  VVPAT) मतदानासाठी तयार करण्याची प्रक्रिया रविवारी (दि. 5) सुरु झाली. ही प्रक्रिया मंगळवार (दि. 7) पर्यंत केली जाणार(Pimpri) आहे.

मतदान यंत्रे तयार करणे व इतर अनुषंगीक कामे करण्यासाठी सेक्टर ऑफीसर, त्यांचे सहायक, अशा एकूण 35 टेबलसाठी 135 अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स केंद्रनिहाय सिलिंग करण्यास देणे व तयार झालेल्या मशीन्स केंद्रनिहाय लावून घेणे, खराब झालेली मतदान यंत्रांची नोंद घेणे व ती बदलून देणे,  EMS वरील माहिती भरून पूर्ण करणे तसेच ईव्हीएम संबंधित सर्व रिपोर्टींग तयार करण्यासाठी 10 अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले(Pimpri) आहे.

 

मतदानास ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तयार करण्यासाठी सिलिंग साहित्याचे टेबलनिहाय ट्रे बनविणे साहित्यांची नोंद विहित नमुन्यात घेण्यासाठी भांडारपाल यांच्यासह 10 अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतदान यंत्र तयार करण्याबाबत सर्व उमेदार व राजकीय पक्षांना कळविण्यात आले असल्याचे पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सांगितले.

तसेच जयराज देशमुख यांची समन्वय अधिकारी, मनोज सेठीया नोडल अधिकारी, अभिजीत केंद्रकर सहायक समन्वय अधिकारी, विजय भोजने संगणक व राजकीय पक्ष पत्रव्यवहार समन्वयक, तुषार पडवळ भांडारविभाग समन्वयक म्हणून नेमणुका करणेत आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.