PCMC : गुन्हेगारांची पिंपरी येथे दुचाकी रॅली; आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज – ‘हमारा भाई जेल से छुट गया है, अभी हम दुश्मन को देख लेंगे’ असे म्हणत 13 जणांनी हातात काठ्या आणि कोयते घेऊन दुचाकी रॅली काढली. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास इंदिरानगर, चिंचवड(PCMC) येथे घडली.

आकाश गणपत चव्हाण (वय 27), आकाश उर्फ काकडी सुरेश दांगडे (वय 27), करण उर्फ छोटू अनिल धोत्रे (वय 22), राहुल उर्फ काळ्या नागनाथ कुऱ्हाडे (वय 25), सतीश उर्फ बांगो बाळू दांगडे (वय 28), ऋषिकेश गेमू राठोड (वय 23), महेश उर्फ मामू राजू विटकर (वय 23), अक्षय नेताजी मोरे (वय 28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्यासह आकाश मंगळू राठोड (वय 28), उमेश धर्मा राठोड (वय 28), राजेश भगवान पवार (वय 29), महेश मलकाप्पा पुजारी (वय 28), तुषार बाळू मांजाळकर (वय 30, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आनंद बजबळकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद(PCMC) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी दुचाकीवरून रॅली काढली. हातात लाठ्या, काठ्या व कोयते घेऊन रॅली काढत दुचाकींचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून लोकांना शिवीगाळ करून रस्त्याच्या बाजूला होण्यास दमदाटी केली. हातातील काठ्या व कोयते हवेत फिरवून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. आरोपींच्या दहशतीला घाबरून लोक भीतीने सैरावैरा पळू लागले होते.

या घटनेनंतर पिंपरी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आठ जणांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.