Pimpri : शहरात स्वतंत्र उद्योगभवन उभारण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीसाठी स्वतंत्र उद्योगभवन उभारण्यात यावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे(Pimpri) यांनी केली आहे.

यासंदर्भात पानसरे यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एमआयडीसी येथे होणाऱ्या नवीन वास्तूमध्ये उद्योग भवन उभारण्यात यावे. त्यामध्ये एमआयडीसीच्या सर्व सेवासुविधा,उद्योग व्यवसाय व व्यापारासाठी लागणारी सर्व कार्यालयांना जागा देऊन एका छताखाली जीएसटी, महावितरण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची शाखा उपलब्ध करून द्यावी.

तसेच कामगार आयुक्तांचे एक स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी राज्य विमा निगम कार्यालय वैगरे उद्योगासाठी निगडित कार्यालये या उद्योगभवनात उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून आस्थापनांना निरनिराळ्या ठिकाणी जाऊन हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

हा वेळ क्रयशक्ती, उद्योग व व्यवसाय, व्यापार क्षेत्राच्या प्रगतीसाठी वापरला जाईल. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या महसुलात वाढ होईल, ही बाब दिलासादायक ठरू शकते.

एमआयडीसीने सिंगल विंडो (एक खिडकी) योजना राबविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास पिंपरी-चिंचवड व सभोवतालचे औद्योगिक क्षेत्र जगाच्या पातळीवर चमकेल, असा विश्वास त्यांनी निवेदनात व्यक्त(Pimpri) केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.