Pimpri : संत तुकारामनगर मधील बैठकीत महायुतीच्या विजयाचा निर्धार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील (Pimpri)शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकवटले असून ठिकठिकाणी संयुक्त बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे.

खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ भाजपचे(Pimpri) मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे व राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या पुढाकाराने संत तुकारामनगर येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदानाची टक्केवारी वाढवून बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीस आमदार उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, भाजप नेते सदाशिव खाडे, अमित गोरखे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, माजी नगरसेवक वसंत शेवडे, नारायण बहिरवाडे, बबनराव गाडवे, जितेंद्र ननावरे, निलेश बारणे तसेच नंदू कदम, माणिकराव अहिरराव, फजल शेख, मायला खत्री, विशाल काळभोर, राहुल खाडे, सतीश नागरगोजे, मंगेश धाडगे, वर्षा जगताप, सुनील पालांडे, राजेश वाबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

 

 

Alandi: माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी पावसाळा पूर्व कामे तत्काळ पालिकेने सुरू करावी-आळंदी जनहित फौंडेशन

आतापर्यंत झालेल्या प्रचाराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. संत तुकाराम नगर परिसरामध्ये प्रत्येक घरापर्यंत उमेदवाराचे परिचय पत्रक पोहोचवण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घरोघर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महायुतीच्या वतीने एक मोठी प्रचार फेरी संत तुकाराम नगर भागामध्ये काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरले.

आमदार खापरे, योगेश बहल, सदाशिव खाडे आदी नेत्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अशाच प्रकारच्या महायुतीच्या संयुक्त बैठका शहराच्या विविध भागांमध्ये घेऊन समन्वयाने अधिक प्रभावी पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे, अशी माहिती खाडे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.