Alandi: माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी पावसाळा पूर्व कामे तत्काळ पालिकेने सुरू करावी-आळंदी जनहित फौंडेशन

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 29 जून रोजी आहे.याच पार्श्वूमीवर पावसाळा(Alandi) पूर्व कामे तत्काळ सुरू करावी याबाबत निवेदन आळंदी जनहित फौंडेशनच्या  वतीने आळंदी नगरपालिकेस देण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, पावसाळ्यात पावसाचे पाणी अनेक ठिकाणी थेट सांडपाणी वाहू नलिकांमध्ये जात नसल्याने (Alandi)सदरचे पाणी रस्त्यावर (मरकळ रस्ता, वडगांव रस्ता,भागीरथी नाला इ.)साचते.त्यामुळे रस्त्यावर  पाणी साचू नये यासाठी असणारे चेंबर्स होल हे मोकळे करावेत. तसेच पुलावर पावसाळ्यात पाणी साचत असते.ते साचू नये यासाठी दक्षता घेत पुलावरील मातीने बंद झालेले होल मोकळे करावेत.
भोई समाज धर्मशाळा जवळील पुल कठडे दुरुस्त करून भागीरथी नाला परिसराची स्वच्छता करण्यात यावी.पावसाचे पाणी भागीरथी नाला रस्त्यावरून वाहते ते चेंबर मधून कसे जाईल याची व्यवस्था करावी.

 

 

Wakad : काळेवाडी फाट्यावर सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून 

 

भागीरथी नाला जवळ असणारी विद्युत डीपी झाकणे उघडी असतात त्या बॉक्सचे झाकण बंद रहावीत याची दक्षता घ्यावी.अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले नसून ते बसविण्यात यावेत.विद्युत पथ दिवे दुरूस्ती व भाविकांसाठी अधिक विद्युत पथ दिवे ठीक ठिकाणी बसविण्यात यावेत.पालखी प्रस्थान सोहळा काळात शहरात व भाविकांना पुरेशा प्रमाणात पाणी राहील यासाठी नियोजन व्हावे.

 

आळंदी हद्दीतील विविध ठिकाणी थेट सांडपाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता पाणी सोडले जात आहे.ते थेट नदीत सोडले जाणार नाही याची दक्षता घेत इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी उपाय योजना व्हावी ,इंद्रायणी नदी आळंदीतून प्रदूषित होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी.चाकण चौक पुलाजवळील सबवे यांची स्वच्छता करून रहदारीस योग्य करावेत.

 

 

मनकर्णिका नाला कायम स्वरुपी बंदिस्त करण्यात यावा.स्वामी महाराज घाट ते आळंदी पालिका पाणी साठवण बंधारा रस्ता विकसित करून दुतर्फा पथ दिव्यांची सुविधा व्हावी .तसेच ड्रेनेज ची सोय व्हावी.व वृक्षारोपण करण्यात यावे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.