PCMC : अनधिकृत शाळांमध्ये पाल्यास प्रवेश घेऊ नये; महापालिकेच्या शिक्षण विभागाचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण 12 अनधिकृत शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश टाळावा

एमपीसी न्यूज – “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 2024-25  या शैक्षणिक वर्षात काही खाजगी तसेच प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालवित आहेत. यामध्ये एकूण 12 शाळांचा समावेश आहे आणि या शाळा बंद करण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. असे असतानाही या शाळा अनधिकृतरित्या चालू ठेवण्यात आल्या असून या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये”, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने(PCMC) करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पिंपळे निलखमधील गांधीनगर येथील पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट, विशालनगर येथील चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळे गुरवमधील जवळकरनगर येथील आयडीएल इंग्लिश स्कूल, चऱ्होली येथील स्टारडम इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर येथील लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, वाल्हेकरवाडी लक्ष्मीनगर येथील नवजित विद्यालय, पिंपळे सौदागर येथील किड्सजी स्कूल, सांगवी येथील एम.एस. स्कूल फॉर किड्स, चिंचवड येथील क्रिस्टल मॉर्डन स्कूल तसेच ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी येथील माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल आणि डी.एम. के. इंग्लिश स्कूल या शाळांचा(PCMC) समावेश आहे.

अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस पालक जबाबदार

अनधिकृतरीत्या चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास त्यांच्या पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस पालक स्वत: जबाबदार राहतील, असा इशारा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

शासन परवानगी घेऊनच शाळा सुरू कराव्यात अन्यथा होणार कारवाई

शाळांच्या संस्थाचालकांनी शासन परवानगी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. अनधिकृतपणे शाळा सुरु केल्यास किंवा चालू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर(PCMC) यांनी दिली आहे.

PCMC: नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा – आयुक्त शेखर सिंह

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.