Hinjawadi : हिंजवडी येथील नामांकित आयटी कंपनी कॉग्निझंट टेक्नोलॉजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

इमारतींच्या बांधकामाच्या संदर्भात पर्यावरण विषयक परवानगी मिळवण्यासाठी दिली होती कोट्यवधी रुपयांची लाच

एमपीसी न्यूज : हिंजवडी येथील माहिती तंत्रद्यान क्षेत्रातील कॉग्निझंट टेक्नोलॉजी  इंडिया सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड,पुणे या नामांकित कंपनीने त्यांच्या हिंजवडी येथील इमारतींच्या बांधकामाच्या संदर्भात साल 2013-2014 च्या दरम्यान  पर्यावरणविषयक परवानगी मिळवताना अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून परवानगी मिळविल्या.

त्यासाठी त्यांनी साल 2013-2014 च्या दरम्यान अंदाजे चार कोटी पन्नास लाख रुपयांची लाच तत्कालीन विविध शासकीय अनोळखी अधिकारी आणि काही खाजगी इसमांना देऊन पर्यावरणविषयक(Hinjawadi) परवानग्या मिळविल्या.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की,तक्रारदार(वय-73) यांनी आज दि.(8 मे) रोजी सकाळी बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारीत सांगितले आहे की, कॉग्निझंट टेक्नोलॉजी  इंडिया सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कॉग्निझंट टेक्नोलॉजी सोलुशन्स  लिमिटेड या अमेरिका स्थित कंपनीची उपकंपनी आहे. या कंपनीचे पुणे,चेन्नई, हैद्राबादसह भारतातील अनेक शहरात प्रोजेक्ट चालू आहेत.

तक्रारदाराने तक्रारीत पुढे नमूद केले की, सन 2012 मध्ये कॉग्निझंट इंडिया टेक्नोलॉजी सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुण्यात हिंजवडी या ठिकाणी व्यावसायिक इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. पुण्यातील या व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी लार्सन आणि टुब्रो कंपनीला कंत्राट दिले होते.कॉग्निझंट इंडिया टेक्नोलॉजी सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुणे येथील प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकामाची जबाबदारी कॉग्निझंट कंपनीचे तत्कालीन अधिकारी श्रीमणीकंदन राममूर्ती यांच्यावर दिलेली होती.

श्रीमणीकंदन राममूर्ती व लार्सन आणि टुब्रो (L&T) या  कंपनीने कॉग्निझंट इंडिया टेक्नोलॉजी सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड,पुणे या हिंजवडी येथील इमारतींचे बांधकामाच्या संदर्भात पर्यावरणविषयक परवानगी मिळवताना तेथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून परवानगी मिळविल्या.त्यासाठी त्यांनी अंदाजे चार कोटी पन्नास लाख रुपयांची लाच तत्कालीन विविध शासकीय अनोळखी अधिकारी आणि काही खाजगी इसमांना(Hinjawadi) दिली.

याबाबत, तक्रारदार यांनी मा.सत्र न्यायालय पुणे येथे क्रिमिनल एम.ए. नंबर 161/2024 प्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, कलम 7,8,12,13(2) या कलमान्वये गुन्हा दाखल होणे साठी अर्ज दिला होता. मा.न्यायालयास या तक्रारीमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्याने तक्रारदार यांचे अर्जावरून मा.विशेष न्यायालय पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे कार्यालयास दिले आहेत.त्यानुसार,आज दि.(8 मे) रोजी फिर्यादी याने फिर्याद दिल्याने  बंडगार्डन पोलीस स्टेशन  येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे येथील पोलीस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.