Sangvi : महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणले – उद्धव ठाकरे

महाविकस आघाडीची सांगवीत प्रचार सभा

एमपीसी न्यूज – पराभवाची भीती वाटत असल्याने विरोधक राम राम राम करत आहेत. मोदींनी मुंबईत (Sangvi)रोड शो केला. त्यांच्यावर रोड शो करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणले, अशी टीका माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. चार जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. देशाचा पंतप्रधान इंडिया आघाडीचा होईल, असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.

महविकस आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या(Sangvi) प्रचारार्थ सांगवी येथे जाहीर सभा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले,निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी पाहिली उमेदवारी संजोग वाघेरे यांची जाहीर केली. विरोधकांना काहीही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे मोदींचे काय करायचे ते जनतेने ठरवलेले आहे. पराभवाची भीती वाटत असल्याने विरोधक राम राम राम करत आहेत. मोदींनी मुंबईत रोड शो केला. महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणले. त्यांच्यावर रोड शो करण्याची वेळ आली आहे. चार जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. पंतप्रधान इंडिया आघाडीचा होईल.

हे मोदी सरकार नाही तर गजनी सरकार आहे. त्यांना काल काय बोललो ते लक्षात राहत नाही. निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सर्वात मोठा घोटाळा आहे. कंत्राटी पद्धतीने केंद्राने रोजगार दिले. त्यामुळे रोजगाराची गॅरंटी राहिली नाही. त्यामुळे मोदी सरकारचे कंत्राट जनता रद्द करणार आहे. बुरसटलेल्या मानसिकतेने तुकारामाची गाथा बुडविली, तीच मानसिकता आता संविधान बदलू पाहत आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योग केंद्राने बाहेर नेले. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव दामदुपटीने परत आणीन. भाजपवर मुले आणि बाप चोरण्याची वेळ आली आहे. शिंदे सेनेचा करेक्ट कार्यक्रम जनता करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.

आपला हक्क मागण्यासाठी शेतकरी दिल्लीला जात होते. पण केंद्र सरकारने त्यांना दिल्लीला येऊ दिले नाही. सर्व शेतकऱ्यांनी आता मतदान केंद्रापर्यंत जाऊन या मोदी सरकारला पायउतार केले करावे असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ” आपण आज योग्य निर्णय घेतला नाहीतर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाही. संविधान बदलले जाईल. असे होऊ नये यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. पिंपरी चिंचवड शहरात एच ए कंपनी, टाटा कंपनी उभारण्यासाठी काँग्रेसच्या काळात सुरुवात झाली. या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. मोदींनी मागील दहा वर्षात अनेक चुकीचे निर्णय घेतले. अर्थव्यवस्था धिमी झाली आहे. प्रचंड कर्ज देशावर झाले आहे. मनमोहन सिंह यांच्या गतीने भाजपने विकास केला असता तर भारत आज पाचव्या नव्हे तर तिसऱ्या स्थानी असला असता. ही निवडणूक महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि गलिच्छ राजकारण या पाच मुद्द्यांवर लढली जात आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडण्यासाठी मोदी यांचा पाठिंबा होता. दिल्लीत सत्तांतर करायचे आहे. सत्तांतर आले नाहीतर संविधान बदलले जाईल. मोदींनी शेतकऱ्यांवर सूड घेण्यासाठी तीन कायदे केले. साखर, कांदा आणि अन्य उत्पादनांवर केंद्राने निर्यातबंदी केली आहे. त्यामुळे शेतकरी, युवक आणि महागाईने त्रस्त झालेली जनता मोदींना पाडेल. येत्या चार जूनला सत्तांतर होईल, असेही चव्हाण म्हणाले.

kharadi: खराडी येथे महापालिकेने अतिक्रमणात जप्त केलेल्या साहित्याला आग

सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधक मतदानासाठी पैशांचे वाटप करतील. अशा लोकांना पकडून थेट पोलीस ठाण्यात न्या. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात गलिच्छ राजकारण झाले. त्याचा अनुभव पाठीशी असताना मावळ मध्ये आपण सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन जागरूक राहिले पाहिजे. पुढचे तीन चार दिवस जागरूक रहा. वाघेरे माझ्यासोबत दिल्लीला येणार आहेत, अशी खात्री सुळे यांनी व्यक्त केली. सध्या सर्वात अधिक भ्रष्ट महापालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांना भाजपने अटक केली. अशा संकटाच्या काळात इंडिया गटातील प्रत्येक पक्षाने ठामपणे सोबत उभे राहून सहकार्य केले. मोदी आणि भाजपवाले पक्षचोर आहेत. राष्ट्रवादीचे घड्याळ चोरले. शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला. मोदी की एक ही गॅरंटी आहे, खोटं बोलण्याची गॅरंटी. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना भाजपने सोबत घेतले. चुकून भाजपने ही निवडणूक जिंकली तर भारतात पुतिन आणि किम जोंग प्रमाणे शासन करतील. त्यामुळे इंडिया आघाडीला सत्तेत आणावे लागणार आहे. मावळच्या जनतेने संजोग वाघेरे लतील यांना निवडून द्यावे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.