kharadi: खराडी येथे महापालिकेने अतिक्रमणात जप्त केलेल्या साहित्याला आग

एमपीसी न्यूज –  खराडी परिसरात आज (बुधवारी) एका (kharadi)गोडाऊन ला  2 च्या सुमारास आग लागली आहे. पुणे महापाालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून जप्त केलेले साहित्य गोदामात ठेवले होते. आगीचे कारण समजू शकले नाही.आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

खराडीत शिंदे डेअरीजवळ असलेल्या गोदामात महापालिकेने एका (kharadi)गोदामात अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य ठेवले होते. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.

Pimpri : …तर विधानसभेला महायुती कायम राहील – महादेव जानकर

गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याने परिसरात घबराट उडाली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.