Pimpri : …तर विधानसभेला महायुती कायम राहील – महादेव जानकर

एमपीसी न्यूज –  मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- (Pimpri)मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तिस-यांदा दिल्लीत जातील, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. मित्र पक्षांना सन्मानाची वागणूक दिली. तर, विधानसभेला महायुती कायम राहील, असेही ते म्हणाले.

मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी जानकर बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर(Pimpri)दौ-यावर आले होते. तत्पुर्वी त्यांनी पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल, भाजप नेते, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.

जानकर म्हणाले, एकदा युती झाल्यानंतर महायुतीचे सर्व नेते जुणे सर्व विसरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लोक मन लावून श्रीरंग बारणे यांचे काम करत आहेत. त्यांच्या पक्षातील लोकांना ते दम देतील.  बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार, पार्थ पवार, जय पवार येतील. महायुतीचे सर्व घटक पक्ष एकजुटीने बारणे यांचे काम करत आहेत. आम्ही एकदिलाने त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.

Shirur : शिरूर तालुक्यातील आपटी गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

मित्र पक्षांना सन्मानाची वागणूक दिली. तर, विधानसभेला महायुती कायम राहील. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अजित पवार यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडला आल्यावर अमेरिका, रशियाला आल्यासारखे वाटते.

या देशाचा पंतप्रधान ओबीसी समाजाचा आहे, ही अभिमानाची बाब आहे. ही देशाची निवडणूक आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी मतदान करावे. काँग्रेसने ओबीसीला घटनात्मक दर्जा दिला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दर्जा दिला. ओबीसीला सर्वाधिक राजकीय भागीदारी देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फक्त एक ओबीसी उमेदवार दिला आहे. दुसरीकडे भाजपने 7 ओबीसी उमेदवार दिले आहेत.

त्यामुळे ओबीसींनी महायुतीला मतदान केले पाहिजे. मोदी यांच्या हातात सत्ता म्हणजे देशाचे संरक्षण हे सूत्र आहे. जगात देशाचे नाव उंच करण्याचे काम ते करतात. त्यामुळे मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी काळेवाडील मेळाव्यात केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.