Maval Loksabha : यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाच्या भविष्याची निवडणूक – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच 500 वर्षापासूनचे अपूर्ण राहिलेल्या राम मंदिराची अयोध्येत स्थापना केली. तिहेरी तलाक पद्धत बंद करून अल्पसंख्यांकातील महिलांना निष्पक्षपणे न्याय दिला. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने राष्ट्रकल्याणाचे कार्य केले आहे. त्यामुळे एक चुकीचे मत देशाचा विकास थांबवू शकते. विकसित भारत करण्यासाठी महायुतीला म्हणजे पंतप्रधान मोदी यांना मत द्यावे”, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दि.(8 मे) रोजी केले.     
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडीत नमो संवाद सभा आणि ओबीसी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत(Maval Loksabha) होते.

 

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित(Maval Loksabha) होते.

 

             

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत. त्यांनी सत्तेत येताच अयोध्येत 500 वर्षानंतर रामलल्लाची स्थापना झाली. तिहेरी तलाक पद्धत रद्द करून अल्पसंख्यांक महिलांना न्याय मिळवून दिला. गेल्या दहा वर्षात मोदीजींनी राष्ट्र कल्याणाचे कार्य केले आहे. त्यांनी देशाच्या सीमा भक्कमपणे सुरक्षित करण्याचे काम केले. यंदाची निवडणूक ही देशाच्या भविष्याची निवडणूक आहे.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. तुमचे एक चुकीचे मत देशाचा विकास थांबवू शकते. मोदी यांना दिलेले एक मत विकसित भारतासाठी असणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मत देऊन मोदीजींना विजयी करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.