Pimpri: स्व.विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक निकाल जाहीर

एमपीसी न्यूज –  समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेने आयोजित(Pimpri) केलेल्या ” स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण रविवारी (दि.5) करण्यात आले.या वर्षीचा स्व विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक सांगलीच्या ” चारुता ” या संघाने जिंकला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मा सुरेश लुणावत, जेष्ठ साहित्यिक मा पुरुषोत्तम सदाफुले, (Pimpri)स्पर्धेचे परिक्षक मा . वर्षा बेडिगेरी कुलकर्णी, दुसरे परिक्षक मा श्री अनिल आठलेकर आणि मा श्री राजेंद्र भागवत हे व्यासपीठावर उपस्थित होते.या प्रसंगी उद्योजक मा अभय पोकर्णा, सौ मीनाताई पोकर्णा,हास्यकवी आनंदराव मुळुक यांचा सन्मान करण्यात आला.

स्पर्धेचा संपूर्ण निकाल खालील प्रमाणे :

सांघिक :
प्रथम – चारुता ( सांगली )
द्वितीय – बहावा ( चिंचवड )
तृतीय – शब्दगंध ( चिंचवड )

वैयक्तिक पुरस्कार : –
काव्यलेखन-
प्रथम – यश सोनार ( बहावा )
द्वितीय -अभिजित काळे ( गझलपुष्प)
तृतीय- अनिल नाटेकर (काव्यसरिता )

सादरीकरण –
प्रथम- शुभदा पाटणकर ( चारुता )
द्वितीय- अवधूत पटवर्धन (कोलाज)
तृतीय- पल्लवी भागवत
(काव्य कस्तुरी)

सूत्रसंचालन / निवेदन
प्रथम – शुभदा दामले ( बहावा )
द्वितीय – प्राची हर्षे ( कोलाज )
तृतीय – सुनिल अधाटे ( टाटा मोटर्स -1)

शोभा जोशी, कैलास भैरट, जयश्री श्रीखंडे, निलेश शेंबेकर, श्रद्धा चटप, मानसी चिटणीस, बाळासाहेब सुबंध, सुरेश जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले आणि उज्वला केळकर यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.