Pune : विमाननगर येथील गिगा स्पेसजवळील न्याती एक्सप्रेस सोसायटीमध्ये आग, युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

अग्निशमन दलाकडून ३ फायरगाड्या व एक उंच शिडीचे वाहन (ब्रॉन्टो) घटनास्थळी रवाना

एमपीसी न्यूज : आज दि.(8 मे) रोजी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास विमाननगर येथील गिगा स्पेसजवळील न्याती एक्सप्रेस सोसायटीमध्ये आग लागली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी आग विझविण्याचे काम (Pune) सुरु आहे.

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की,न्याती एक्सप्रेस विमान नगरमध्ये आयकॉनिक लँडमार्क आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास न्याती एक्सप्रेस सोसायटीमध्ये आग लागली असून धुराचे लोट पाहायला मिळाले. अग्निशामक दलाकडून युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु असून घटनास्थळी 3 फायरगाड्या व एक उंच शिडीचे वाहन (ब्रॉन्टो) रवाना झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजले(Pune) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.