Pune : विमाननगर येथील गिगा स्पेसजवळील,न्याती एंम्प्रेस या इमारतीत आग; आग आटोक्यात आणण्यात यश

सुदैवाने,सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

एमपीसी न्यूज :आज दि.(8 मे) रोजी दुपारी 5 वाजता विमाननगर येथील  गिगा स्पेस जवळ,न्याती एंम्प्रेस या इमारतीत आग लागल्याची वार्ता मिळताच अग्निशमन दलाकडून नायडू, हडपसर व मुख्यालयातून वाॅटर टँकर व उंच शिडीचे वाहन (ब्रॉन्टो) वाहन आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाचे एक वाहन तातडीने रवाना करण्यात(Pune) आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर व्यावसायिक 9 मजली इमारतीत सहाव्या मजल्यावर एका कार्यालयात (ऑफिस) मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले. जवानांनी लगेच घटनेचे गांभीर्य ओळखून कोणी आतमध्ये अडकले अथवा कसे याची माहिती त्या इमारतीत व आसपासच्या इमारतीमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेत आगीवर पाणी मारण्याचे काम सुरु केले.

आगीवर ठीक संध्याकाळी 6 वाजता नियंत्रण आणत पुढील धोका अग्निशमन दलाकडून दूर केला. आग इतर कुठल्याही  मजल्यावर अथवा इतरञ पसरणार नाही हे पाहत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले. इमारतीमध्ये असणारी स्थायी अग्निशमन यंञणा सुरु असल्याने आग विझवण्यात याची मोठी मदत झाली. धूर बाहेर काढण्यासाठी जवानांनी एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर केला. तसेच, दलाकडील उंच शिडीचे वाहन (ब्रॉन्टो) याचा वापर करुन थेट सहाव्या मजल्यावर आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा करता आला. ऑफिसमध्ये फर्निचरचे काम सुरु असताना आग लागली असे समजले.

सुदैवाने,सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या कामगिरीत दलाचे अधिकारी व जवान(Pune) अशा एकूण 30 जणांनी आग विझविण्यात सहभाग घेतला.

नागरिकांनी सदनिकेत अथवा कार्यालयात फर्निचरचे काम करताना, लाकडी भुशाची धूळ त्वरीत पेट घेऊन आग नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे गृहीत धरून किमान एक तरी अग्निशामक यंत्र(Fire extinguisher) जवळ उपलब्ध ठेवावे, असे आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.