Maval LokSabha: मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, बोटीसह लागणार 525 वाहने

एमपीसी न्यूज – येत्या सोमवारी दि.(13 मे) रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. सुमारे 12 हजार मतदार अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह 175 पीएमपीएमल बसेस, 219 एसटी महामंडळाच्या बसेस, 105 मिनी बसेस, 25 ईव्हीएम कंटेनर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 2 हजार 566 मतदान  केंद्रावर एकूण 11 हजार 368 मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले(Maval LokSabha) आहेत.

तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर 83 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी 1 हजार 958 बॅलेट युनिट, 750 कंट्रोल युनिट आणि 788 व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान यंत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपुर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात  25 लाख 85 हजार 18 मतदार असून यामध्ये 13 लाख 49 हजार 184 पुरूष मतदार, 12 लाख 35 हजार 661 महिला मतदार आणि 173 तृतीयपंथी मतदार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात 33 उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 5 लाख 91 हजार 398 मतदार आहेत. त्यामध्ये 3 लाख 17 हजार 96 पुरूष, 2 लाख 74 हजार 231 महिला तर 71 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच पनवेल मतदारसंघात 544 मतदान केंद्रे असून याठिकाणी 2 हजार 404 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 1 हजार 958 बॅलेट युनिट, 750 कंट्रोल युनिट आणि 788 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी 46 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 86 एसटी बसेस, 15 मिनी बसेस, 20 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर अशा 125 वाहनांची याठिकाणी आवश्यकता असणार आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 9 हजार 208 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 55 हजार 286 पुरूष, 1 लाख 53 हजार 917 महिला तर 5 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 339 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 500 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 220 बॅलेट युनिट,  467 कंट्रोल युनिट आणि 491 व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी 47 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 43 एसटी बसेस, 21 मिनी बसेस, 8 जीप, 6 ईव्हीएम कंटेनर अशी 78 वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 19 हजार 311 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 60 हजार 709 पुरूष, 1 लाख 58 हजार 593 महिला तर 9 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 344 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 520 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 1 हजार 238  बॅलेट युनिट,  474 कंट्रोल युनिट आणि 498 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी 60 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 41 एसटी बसेस, 22 मिनी बसेस, 28 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर आणि 1 बोट अशी 96 वाहनांची आवश्यकता भासणार आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 73 हजार 408 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 91 हजार 702 पुरूष, 1 लाख 81 हजार 693 महिला तर 13 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 390 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 732 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 404 बॅलेट युनिट,  553 कंट्रोल युनिट आणि 592 व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. यासाठी 45 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 49 एसटी बसेस, 27 मिनी बसेस, 20 जीप, 3 ईव्हीएम कंटेनर अशी 99 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 लाख 18 हजार 245 मतदार असून त्यामध्ये 3 लाख 27 हजार 961 पुरूष, 2 लाख 90 हजार 239 महिला तर 45 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 549 मतदान केंद्रे असून याठिकाणी 2 हजार 436 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 1 हजार 976 बॅलेट युनिट,  779 कंट्रोल युनिट आणि 839 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी 48 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 102 पीएमपीएमएल बसेस, 20 मिनी बसेस, 16 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर अशी 142 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 76 हजार 448 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 96 हजार 430 पुरूष, 1 लाख 76 हजार 988 महिला तर 30 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 400 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 776 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या केंद्रांवर 1 हजार 440 बॅलेट युनिट, 568 कंट्रोल युनिट आणि 608 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी 45 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 73 पीएमपीएमएल बसेस, 1 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर अशी 78 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मतदान व मतदानोत्तर प्रक्रियेच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन  करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता पिण्याचे पाणी, औषधे, मंडप उभारणी, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सुविधांसह इतर तांत्रिक बाबींचीही पूर्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदार केंद्रांची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने  https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर असलेले क्युआर कोड स्कॅन करून मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचेही दीपक सिंगला(Maval LokSabha यांनी सांगितले.

Maval Loksabha Election: ‘या’ 12 ओळखपत्रांद्वारे मतदारांना मतदान करता येणार -दीपक सिंगला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.