Online crime : तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ आहेत असे सांगून वृद्ध महिलेची दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – विमानतळावर परदेशातून पाठवलेल्या पाकिटात  अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी कोरेगाव पार्क भागातील एका ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद(Online crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधला. फेडेक्स कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून आकाश कुमार बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली. मुंबई विमानतळावर फेडेक्स कुरिअर कंपनीकडून पाठविण्यात आलेले पाकिट सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त करण्यात आले आहे.

 

पाकिटात अमली पदार्थ सापडले असून, याप्रकरणी मुंबईतील अमली पदार्थ विभागात (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई टाळायची असेल तर एक ॲप डाऊनलोड करा, असे चोरट्याने सांगितले. बँक खात्याची माहिती चोरट्याने घेतली. बँक खात्याची माहिती पडताळण्यासाठी तुमच्या खात्यातील सर्व पैसे माझ्या खात्यात पाठवा, अशी बतावणी चोरट्याने केली.

Pimple Nilakh : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

चोरट्याच्या सांगण्यावरुन महिलेने चोरट्याच्या खात्यात 2 कोटी 80 हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली. असून सायबर पोलीस पुढील तपास(Online crime) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.