Wakad : दररोज 10 ते 20 टक्क्यांचा परतावा देण्याच्या बहाण्याने एक कोटी 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दररोज 10 ते 20 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक कोटी 13 लाख 50 हजार 17 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 22 ते 30 एप्रिल या कालावधीत रहाटणी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल(Wakad) करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस एका अनोळखी क्रमांकावरून व्हाट्सअप कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मोतीलाल ओसवाल कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज 10 ते 20 टक्के रिटर्न देऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर फिर्यादीस एक लिंक पाठवून त्यांना एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले.

सुरुवातीला फिर्यादी कडून 50 हजार रुपये, त्यानंतर चार लाख रुपये व त्यानंतर 10 लाख रुपये घेण्यात आले. हे पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 15 वेळा ट्रांजेक्शन करून 99 लाख 17 रुपये ट्रान्सफर करून घेत फिर्यादीची एकूण एक कोटी 13 लाख 50 हजार 17 रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.