Chakan : बसमध्ये चढताना महिलेच्या खिशातून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – चाकण मधील तळेगाव चौकात पीएमपी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्या खिशातून मोबाईल फोन काढून नेला. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी सव्वाआठ वाजता(Chakan) येथे घडली.याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला चाकण मधील तळेगाव चौकात बस थांब्यावर थांबल्या होत्या. बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या समोरील खिशातून 40 हजार रुपये किमतीचा आयफोन काढून चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.