Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 22 लाख 80 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आमच्या सल्ल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची, असे सांगत एका व्यक्तीची 22 लाख 80 हजारांची फसवणूक केली. ही घटना 30 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम रामजी, मेलीस्सा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल(Pimple Saudagar) करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फेसबुकवर गुंतवणुकीसंदर्भात जाहिरात दिली. त्यानंतर फिर्यादीस एका व्हाटसअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. शेअर मार्केट मध्ये आरोपी सांगतील त्या शेअरवर पैसे गुंतवायचे. त्यातून अधिक पैसे मिळतील, असे आमिष दाखवून फिर्यादीला 22 लाख 80 हजारांची गुंतवणूक करण्यास सांगत त्यांची(Pimple Saudagar) फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.