Hinjawadi : डंपरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वृद्ध महिलेला भरधाव डंपरने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 20 एप्रिल रोजी विनोदेनगर, हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी 4 मे रोजी गुन्हा दाखल(Hinjawadi) करण्यात आला आहे.

मुक्ताबाई भगवान विनोदे (वय 73, रा. विनोदेनगर, हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तुषार गोपाल विनोदे (वय 25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 12/एफसी 6793) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आजी मुक्ताबाई या विनोदेनगर हिंजवडी येथे रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्या विशाल प्रोपार्टीजच्या ऑफिससमोर आल्या असता भरधाव आलेल्या डंपरने(Hinjawadi) त्यांना धडक दिली. त्यात मुक्ताबाई या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.