Chinchwad : चिंचवडमधील दत्तनगर येथे घरफोडी करून साडेसात लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील दत्तनगर येथे घरफोडी करून चोरट्याने सात लाख 60 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 1 मे रोजी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

इम्तियाज उर्फ सुरज नजीर शेख (वय 35, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास उर्फ पायल उर्फ कविता (पूर्ण नाव माहिती नाही. मूळ रा. चंद्रपूर) याच्या विरोधात गुन्हा(Chinchwad) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांच्या घरातून आरोपीने 14.5 तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख्र रक्कम असा एकूण सात लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.