Nigdi : ट्रान्सपोर्टनगर येथून पिस्तूलासह एकास अटक

एमपीसी न्यूज – निगडी परिसरातील ट्रान्सपोर्टनगर येथून एका तरुणाला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 4) सायंकाळी सव्वासात वाजता निगडी पोलिसांनी केली. 

 

मोहम्मद महबूब कोरबू (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनायक मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद(Nigdi) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे एका गॅरेज जवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मोहम्मद कोरबू याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेत त्याच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस(Nigdi) जप्त करण्यात आले. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.