Nigdi : पूर्ववैमनस्यातून एकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एकावर पालघन ने मारहाण करत जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी (दि.8) निगडी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात राहुल दत्ता कुदळे (वय22 रा.निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून बबलू मोरे,जितेंद्र जाधव,अमन शेख,शेखर माने सर्व रा.ओटास्किम यांच्यावर गुन्हा(Nigdi) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अंगणात आले असता बबलू मोरे याने जुन्या भांडणाच्या रागातून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे आरोपींनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर मोरे याने डोक्यात पायावर पालघनने मारून गंभीर (Nigdi) जखमी करत जीव मारण्याचा प्रयत्न केला.तसेच हातातील पालघन हवेत फिरवून आरडाओरड करत मी इथला भाई आहे,असे बोलून दहशत पसरवली.याप्रकरणी निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.