Chinchwad : उघड्या दरवाज्याद्वारे लॅपटॉप आणि मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाज्याद्वारे अज्ञात चोरट्याने एक लाख पाच हजार रुपये किमतीचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी साडेसहा ते नऊ वाजताच्या कालावधीत वाल्हेकरवाडी(Chinchwad) येथे घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाल्हेकरवाडी मधील गुरुद्वारा चौकात भाड्याने राहतात त्यांच्या खोलीचा दरवाजा शनिवारी सकाळी उघडा होता.  त्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने खोलीत प्रवेश केला खोलीतून एक लाख 5 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरट्याने चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत(Chinchwad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.