Loksabha Election: मावळमध्ये 77 टक्के, पुणे 61 टक्के, शिरुरमध्ये 64 टक्के मतदार चिठ्ठ्यांचे वितरण

एमपीसी न्यूज – पुणे  जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभेसाठी सोमवार दि. (13 मे) रोजी मतदान होणार असून तिन्ही मतदारसंघातील मतदार चिठ्ठ्या वितरणाचा अपर जिल्हाधिकारी तथा मतपत्रिका वितरण समन्वय अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी आढावा घेतला. मावळमध्ये 77 टक्के, पुणे 61 टक्के, शिरुरमध्ये 64 टक्के मतदार चिठ्ठ्यांचे वितरण(Loksabha Election) झाले आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वय अधिकारी अर्चना तांबे, सहायक मतपत्रिका वितरण समन्वय अधिकारी वर्षा पवार, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, तिन्ही लोकसभा मतदारसंघातील सहकारी संस्थांचे उपनिबंधक उपस्थित होते.

Maval LokSabha: मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, बोटीसह लागणार 525 वाहने

मावळ लोकसभा मतदारसंघात 77 टक्के, पुणे 61 टक्के व शिरुर लोसभा मतदार संघात 64 टक्के मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आल्याचे सांगून  धायगुडे म्हणाल्या, शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सोसायट्यांमधील मतदारांना जास्तीत जास्त मतदानासाठी प्रेरित करण्यावर प्रशासनाने भर दिला(Loksabha Election) आहे.

तसेच,जिल्हा उपनिबंधक, लेखापरीक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी समन्वय ठेऊन प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करावे व तेथील नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. मतदार चिठ्ठी म्हणजे ओळखपत्र नाही, मतदान करण्यासाठी  मतदार ओळखपत्र किंवा ते नसल्यास भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेल्या अन्य 12 पुराव्यांपैकी एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे  धायगुडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.