Today’s Horoscope 09 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 09 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 09.05.2024.

शुभाशुभ विचार – क्षयतिथी.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 01.30  ते  03.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – कृत्तिका 11.15 पर्यंत नंतर रोहिणी.

चंद्र राशी – वृषभ.
—————————–
मेष  ( शुभ रंग- निळा)

कठोर बोलण्याने नाती दुरावतील. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. आवक मनासारखी असली तरीही आज बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घेऊ नका जशास तसे या धोरणाने वागा. आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल.

मिथुन (शुभ रंग – केशरी)

अत्यावश्यक देणी आज चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. घरात मोठ्यांची मने जपावी लागतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

कर्क ( शुभ रंग- मोरपंखी)

जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

सिंह ( शुभ रंग- निळा)

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठ आज तुमच्यावर खुश असतील. अधिकार योग चालून येतील. हाताखालच्या लोकांवर वचक राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

कन्या (शुभ रंग- जांभळा)

अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होऊ शकते. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका दंड भरावाच लागेल.

तूळ (शुभ रंग- भगवा)

नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. गाडी चालवताना स्टंट करू नका.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.
धनु (शुभ रंग- राखाडी)

काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मकर (शुभ रंग- सोनेरी)

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन कराल.

कुंभ ( शुभ रंग- मोतीया)

धंद्यातील येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेणे तुम्हाला जमेल. गरजूंना मदत कराल.

मीन (शुभ रंग- चंदेरी)

आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. अतिउत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.