PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटवा, अन्यथा…!

एमपीसी न्यूज –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक ( PMRDA) जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी आवाहन केल्यानुसार आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारकांनी परवानगी घेण्याकरिता विकास परवानगी विभागाकडे एकूण 176 प्रकरणे दाखल केली आहेत. प्राधिकरण कार्यक्षेत्रामध्ये होर्डिंग पडून, कोसळून दुर्घटना होणार नाही याची खबरदारी म्हणून महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांच्या अध्यक्षतेखाली आकाशचिन्ह कक्ष (कारवाई विभाग) तहसिलदार तथा कक्ष प्रमुख सचिन मस्के यांच्या कारवाई पथकाने आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारकात जनजागृती केली.

LokSabha Elections 2024 : निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

या कारवाईत वाऱ्याला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जाहिरात फलकावरील पत्रा, कापड स्वतःहून काढण्यास प्रवृत्त करण्यात आल्याने बऱ्याच फ्लेक्सधारकानी फ्लेक्सवरील पत्रा, कापड स्वतःहून काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच 5 आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारक यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःहून निष्कासित केले आहेत.

प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत, धोकादायक आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरित स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा ते निष्कासित करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद  घ्यावी, असेही पीएमआरडीएचे विकास परवानगी विभागाचे महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांनी कळविले ( PMRDA) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.