Pune: लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी युडीसीपीआर लागू केले याबद्दल मनःपूर्वक आभार – माजी नगरसेवक

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे हद्दीत समाविष्ट 23 गावांना नियोजनासाठी(Pune) जरी पीएमआरडीएमध्ये समाविष्ट केले तरी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी युडीसीपीआर लागू केले याबद्दल मनःपूर्वक आभार, मानत असल्याचे माजी नगरसेवकांनी सांगितले. 
एकात्मिक वसाहत योजना Integrated Township Scheme (ITS) महाराष्ट्रभर(Pune) लागू केली. परंतु, ज्या पीएमआरडीए क्षेत्रातील 15ते 18 योजनांना हे लागू करायचे होते त्यांना हे लागू होत नाही, असे आम्ही पत्र दिल्यानंतर तातडीने नगर विकास विभागामध्ये हालचाल होऊन खूप दिवस आवश्यक असणारे 23 गावांना लागू करण्याचा निर्णय घेतला. कारण काही का असेना परंतु,  या गावांना लागला एका अर्थाने फार चांगले झाले, असे माजी नगरसेवक उज्जवल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीतून 23 गावे वगळून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट केली. दि. 30 जून 2021 त्या दिवशी या गावांमध्ये जो काही विकास  आराखडा प्रारूप विकास आराखडा त्याचा प्रस्ताव तयार होता तो संपला आणि जर तो पुन्हा पीएमआरडीकडे सोपवायचा तर त्यांना पुन्हा कलम 23 प्रमाणे सर्व प्रक्रिया राबवावी लागते हा कायदा आहे. त्यामुळे या गावांमधला प्रारूप विकास आराखडा हा संपुष्टात आलेला आहे.
या ठिकाणी आता फक्त प्रादेशिक योजना अस्तित्वात आहे. अजून वेळ गेली नाही योग्य निर्णय करा, कायदेशीर या गावांच्या मधलं नियोजन हे पुणे महानगरपालिकेला सोपवा, अथवा मुदत संपल्यामुळे सहसंचालक नगर रचना पुणे विभाग यांच्याकडे हा नकाशा हा प्लॅन केलेला आहे. त्यांना पुढील कारवाई करायला सांगा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.