Pune: शरद पवारांबद्दलचे पंतप्रधानांचे वक्तव्य दुदैवी ; काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत- मोदींनी आत्मविश्वास गमावल्याचीही टीका

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार(Pune) यांचा जो उल्लेख केला तो दुदैवी असून निषेधार्य आहे. शरद पवारांना त्यांनी यापूर्वी गुरू आहेत, असे संबोधिले होते. ते जर खरेच गुरू असतील तर गुरू बद्दल असे शब्द वापरणे योग्य नाही, अशी खंत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार  यांनी व्यक्त केली. पवारांबद्दल मोदींनी वापरलेले शब्द पाहता राजकारणाचा स्थर किती घसरला आहे, हे कळते.

मोदींची ही भाषा राजकी़य संस्कृतीसाठी दुदैवी असून गेल्या दहा वर्षात‌केवळ (Pune)जुमलेबाजी केल्याने मोदींना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, खुर्च्या मोकळ्या असतात, त्यामुळे मोदी आत्मविश्वास गमावत आहेत,अशी टिकाही पवार यांनी केली.

पुण्यातील रेसकोर्स मैदानावरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता, भटकती आत्मा असा उल्लेख करत हा आत्मा राज्य, घर आणि देश अस्थिर करत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उल्हास पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा निषेध करत खंत व्यक्त केली. तसेच मोदी व भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका केली.

PCMC : सेवानिवृत्तीनंतर आनंदी जीवन जगावे – सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर

ते म्हणाले, जुमलेबाजीमुळे त्यांच्या‌सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या‌ सभांना निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या मोकळ्या रहात आहेत. पंतप्रधान लोकसभा किंवा विधानसभेला एखाद्या राज्यात पाच सात‌ सभा घेतात, मात्र मोदी एका राज्यात  महापालिकेच्या निवडणुकीसारखे एका जिल्ह्यात दोन दोन सभा घेत आहेत. याचा अर्थ त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. स्वत:च्या राज्यात सभा घ्यावी लागते. सत्तर वर्षात काँग्रेसने काय‌ केले यापेक्षा गेल्या दहा वर्षात‌ त्यांनी काय केले, हे आता सांगावे. सातशे वीस शेकऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव नाकारला, हा असंवेदनशिलतेचा कळस आहे. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

मोदींचे‌ तीन तीन मंत्री आम्ही राज्य घटना बदलणार असल्याचे सांगतात, आणि मोदी म्हणतात, मी घटना बदलणार नाही. कालच्या सभेतील त्यांचे भाषण पायाखालची वाळू घरली आहे हे सिद्ध करणारे होते. त्यांचा अभ्यास नाही, त्यांना देशाच्या इतिहासाचे ज्ञान नाही, चुकीचा इतिहास‌ सांगतात, हा माणूस दहा वर्षात कधी‌ चीन शब्द उच्चारत नाहीत, ते‌ चिनला एवढे का भितात, कळत नाही.

मोदींनी प्रत्येकाच्या‌ डोक्यावर सव्वा लाखाचे कर्ज करून ठेवले आहे.

 

सत्तार हजार कोटीच्या भ्रष्टाचारावर मोदींनी पुण्यातील सभेत बोलायला हवे होते, ज्यांच्याबद्दल मोदी बोलले होते, ते काल त्यांच्या शेजारी बसले होते. देशात दुही माजवण्याचे‌ काम कोण करतंय ते जनतेला माहिती आहे. महिलांच्या अत्याचारावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. महिलांवर अत्याचार करणारे त्यांचे आमदार, नेते अडकले आहेत.

 

हिंदू धर्माचा उदो उदो करणाऱ्या मोदींनी श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी रामाचा व तिर्थाचा आपमान केला, असेही उल्हास पवार म्हणाले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड,  राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके इत्यादी उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.