PCMC : सेवानिवृत्तीनंतर आनंदी जीवन जगावे – सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर

एमपीसी न्यूज –  सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाबरोबरच विविध आर्थिक लाभ मिळणारच आहेत, या व्यतिरिक्त सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना विशेषत: वृद्ध आई-वडिलांनाही वेळ द्यावा आणि आनंदी जीवन जगावे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर(PCMC) यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सह आयुक्त इंदलकर यांच्या हस्ते माहे एप्रिल 2024 अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या 19  कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निमित्त स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना(PCMC) ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी, प्रशासन अधिकारी  दशरथ कांबळे, कर्मचारी महासंघाचे बालाजी आयंगार , विजया कांबळे, नथा माथेरे तसेच संजय जगदाळे आणि  सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक  उपस्थित होते.

PCMC : मतदानासाठी महापालिका कर्मचार्‍यांना सुट्टी जाहीर

आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उपअभियंता देवेंद्र हनुमंतराव बोरावके, विद्युत विभागाचे उपअभियंता सुनिल भालेराव, कार्यालयीन अधीक्षक शोभा किरवे, मुख्याध्यापिका अलका बावळे, भारती यादव , कल्पना गव्हाणे , मुख्य लिपिक रमेश सूर्यवंशी , वायरलेस ऑपरेटर विनायक शेवतीकर, ए.एन.एम. लता जगताप, सिस्टर इनचार्ज शोभा माने , पद्मिनी फ्रान्सिस, वाहनचालक संजय कु-हाडे, मुकादम ज्ञानेश्वर डामसे, मजूर रविंद्र अहिराव, दत्तू भिसे, पांडुरंग दांगट, शिपाई विजय म्हस्के , सफाई कामगार संपत कांबळे, सफाई सेवक संतराबाई चंन्नाल  यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी मांडले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.