Pune : पुण्यात सांस्कृतिक स्पर्धेचा बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी लुटला आनंद

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पौड रोड शाखा व कला संस्कृती आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दिनांक 28 एप्रिल) रोजी ABBM आयडॉल 2 या स्पर्धेचे आयोजन करण्यात(Pune) आले होते.

लॉ कॉलेज रोड वरील आगाशे शाळेच्या हॉल मध्ये झालेल्या भरगच्च कार्यक्रमाला श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. गायन, वादन, नृत्य, नाट्यछटा या विभागात सुमारे 50 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. आठ वर्षाच्या मुलापासून ते 84 वर्षाच्या जेष्ठापर्यंत(Pune) सर्वांचा यात समावेश होता.

या कार्यक्रमाला मकरंद कुलकर्णी, दत्तात्रय देशपांडे, जयश्री घाटे, डॉ अरुण जोशी, चित्रा जोशी,अजित खरे, अमोघ पाठक, ऋचा पाठक, अमोल व तृप्ती कुलकर्णी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या पारंपरिक नृत्यशैली वर आधारीत वेशभूषा व त्याला साजेसा अविष्कार आपल्या नृत्यातून, गाण्यातून, नाट्यछटेतून सादर करण्यात आले. संतूर, कॅसिओ, पेटी, माऊथ ऑर्गन सारख्या वादकांनी या स्पर्धेला रांगत आणली. विशेष मुली स्पर्धकांनी (special child)  रसिकांची मने जिंकली आहेत.

स्पर्धेचे विजेते

गट 1 (16 वर्षापर्यंत)

1. अद्वैत तांबेकर (नृत्य)

2. ईश्वरी कुलकर्णी (गायन)

3. ध्रुव वाघोलीकर (वादन)

गट 2 (16 ते 50 वर्षे )

1. प्रीती नगरकर (नृत्य)

2. दीपिका तांबेकर (गायन)

3. श्वेता लिमये (गायन)

गट 3 (50 वर्षाच्या पुढे)

1. मीनल गानू (गायन)

2. दयाकर दाबके (गायन)

3. मेधा जोशी (वादन)

विशेष उल्लेखनीय

1. सुरेश फडणीस

प्रत्येकात एक कला दडलेली असते व अशा कलाकारांना एक व्यासपीठ मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे उद्गार पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी काढले. केतकी कुलकर्णी (जिल्हाध्यक्षा महिला आघाडी) यांनी प्रास्ताविक केले,प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांनी नांदेड वरून येऊन आवर्जून या कार्यक्रमाला उपास्थिती लावली व स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या. गणेशस्तवन सीमा रानडे यांनी आपल्या मधुर स्वरात केले, कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन दीपा केळकर यांनी केले व आभार मंजुषा खिरवडकर यांनी मानले.

या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन विवेक खिरवडकर (पौड रोड शाखा अध्यक्ष), उदय सुभेदार (कला संस्कृती आघाडी अध्यक्ष), गीता देशमुख (उपाध्यक्ष), दीपक कुलकर्णी (उपाध्यक्ष), रवींद्र रानडे, माधव तिळगूळकर, अनिरुद्ध पळशीकर यांनी केले.

पाच परीक्षकांच्या टीम ने सर्व आवश्यक निकषावर स्पर्धेचा निकाल दिला. यात गौरी शिकारपूर, सानिका खरे, नीता शेबेकर, राजश्री महाजनी व मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश होता. शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.