Kasarwadi : बिअरचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालकाला दमदाटी करत गाडीचे नुकसान

एमपीसी न्यूज – बिअरचे पैसे मागितले म्हणून एका हॉटेल चालकाला पाच जाणांनी दमदाटी करत त्याच्या गाडीचे नुकसान केले आहे. ही घटना रविवारी (दि.28) कासारवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ऋषीकेश उर्फ मुंगळ्या विश्वनाथ मोटे (वय 20 रा.कासारवाडी) याला अटक केली असून त्याचे साथीदार अरमान कपील देशमुख , रोहित कदम,अभी मोरे व  शिवा पवार यांच्यावर गुन्हा(Kasarwadi) दाखल केला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात अमृत अण्णय्या शेट्टी (वय 36 रा.कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कासारवाडी येथे वरूण रेस्टॉरंट अन्ड बार असे हॉटेल आहे. तेथे आरोपी आले त्यांनी बिअर घेतली मात्र त्यांनी त्याचे पैसे दिले नाहीत. याबाबत फिर्यादी यांनी अरमानच्या वडिलांना फोन करून याबबात माहिती देत पैशांची मागणी केली. याचाच राग येऊन आरोपींनी फिर्यादीच्या हॉटेलवर जात मी कासरवाडीचा भाई आहे तू भाईला पैसे मागतो म्हणत दमदाटी केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील 2 हजार 700 रुपये काढून घेतले. तसेच फिर्यादीच्या गाडीवर दगड मारून नुकसान केले.तसेच पोलिसांकडे तक्रार केली(Kasarwadi) तर हॉटेल चालू देणार नाही अशी धमकी दिली यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.