Ravet : रावेत पंपिंग स्टेशनच्या स्टोअर रूमला आग 

एमपीसी न्यूज – रावेत येथील निगडी एमआयडीसी पंपिंग स्टेशनच्या (Ravet)स्टोअर रूमला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास घडली. यावेळी स्टोअर रूम मधील क्लोरीन पावडर व इतर रसायनाचे मिश्रण होऊन टॉक्सिक धूर निर्माण झाला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या  सुमारास रावेत (Ravet)येथील निगडी एमआयडीसी पंपिंग स्टेशन मधील स्टोअर रूमला आग लागली. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळाली असता पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र, प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र येथील सब ऑफिसर गौतम इंगवले, लीडिंग फायरमन प्रतीक कांबळे, लीडिंग फायरमन विकास नाईक, फायरमन काशिनाथ ठाकरे, सुशील चव्हाण, अभिषेक भांगे, विकास कुटे आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

Pune: श्री शाहू वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

 

स्टोअर रूम मध्ये जलशुद्धीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी क्लोरीन पावडर, ब्लिचिंग पावडर, केबल बंडल, ऑइल ड्रम व स्टोरेज मटेरियलचे आगीत नुकसान झाले. आगीवर नियंत्रण मिळवत असताना क्लोरीन पावडर व इतर रसायनाचे मिश्रण होऊन टॉक्सिक धूर निर्माण झाला. या ठिकाणी बीए सेट परिधान करून फोमचा वापर करून जवानांनी आग नियंत्रणात आणली.
त्या नंतर केमिकल डायलूट करण्यासाठी पाण्याचा जेट व स्प्रेचा वापर करून केमिकल्स डायलूट करण्यात आले. जवळ नागरी वस्ती नसल्याने मोठा धोका टळाला. या घटनेत कोणीही जखमी नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.