Pune :कोथरूड येथे आंब्याच्या झाडावर चढलेला इसम बेशुध्द; अग्निशमन दलाकडून सुटका

अग्निशमन दलाच्या जवानांची कौतुकास्पद कामगिरी

एमपीसी न्यूज –  आज दि.(30 एप्रिल) रोजी दुपारी 3.48 वाजता पौड रोड,कोथरूड येथील गल्ली क्र.3 येथे एका  इमारतीच्या मागच्या बाजूस झाडावर एक इसम चढला असून तो अडकला आहे अशी वार्ता अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळताच अग्निशमन दलाने फायरगाडी व मुख्यालयातून रेस्क्यु व्हॅनच्या त्वरीत रवाना करून(Pune) आंब्याच्या झाडावर अडकलेल्या इसमाला उतरवले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रवाना केले.

 

सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, एका उंच आंब्याच्या झाडावर तीन फांद्याच्या मधोमध एक इसम सुमारे पस्तीस फुट उंच अडकलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच जवान दलाकडील शिडी झाडाला लावून झाडावर गेले आणि त्यांनी सदर इसमाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्याची शुध्द हरपली असून तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे जाणवले. त्याचवेळी तातडीने दोरीचा वापर करुन रेस्क्यु बेल्टच्या साह्याने तसेच त्याचे वजन अंदाजे शंभर किलोच्या आसपास असल्यानेविशेष गाठीचा उपयोग करुन त्या इसमाला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेत सुमारे 30 मिनिटात झाडावरुन खाली उतरवले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून  रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले.

 

 

Chinchwad : शहर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, तांडेल आंगद लिपाणे, वाहनचालक महेश शिळीमकर, शरद गोडसे, फायरमन रोशन हरड, वैभव आवरगंड, रविंद्र बडे, प्रतीक पागसे, मारुती देवकुळे, कृष्णा नरवटे, महेश घुले, सुबोध भुतकर, परेश जाधव यांनी(Pune) सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.