Kothrud: पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात पं सुहास व्यास यांचा पं जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने सन्मान 

एमपीसी न्यूज – उज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान (Kothrud)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या 18 व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं व्यास यांचा पं जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सदर महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे (Kothrud)उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले.

महोत्सवाचे आयोजक आणि  पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं शौनक अभिषेकी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले, पं सुहास व्यास यांच्या पत्नी अनुराधा व्यास, सुप्रसिद्ध गायिका विदुषी देवकी पंडीत, गायिका सानिया पाटणकर, गोविंद बेडेकर, बढेकर समूहाचे प्रवीण बढेकर, आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष महेश पानसे, विदयेश रामदासी आदी उपस्थित होते. यावर्षी महोत्सवासाठी बढेकर गृप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टपर्पज को ऑपरेटिव्ह बँक लि., अंशुमन टेक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

यावेळी या वर्षीचा ‘प्रथितयश गायिका पुरस्कार’ सुप्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवाय संगीत क्षेत्रातील कार्यक्रमांचे यशस्वीपणे संयोजन करणारे गोविंद बेडेकर यांना ‘यशस्वी संयोजक पुरस्कार’ देत तर पंडित रामदास पळसुले यांचा सन्मान करीत त्यांचाही गौरव करण्यात आला.

यानंतर अभिषेकी बुवांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या रचनांचे सादरीकरण असलेला ‘स्वराभिषेक’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ राजा काळे, पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य, सुपुत्र व सुप्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व प्रसिद्ध गायक आनंद भाटे आदी कलाकारांनी सादरीकरण केले.

 

Sharad Pawar : शरद पवार गटाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर होणार?

यावेळी पंडित रघुनंदन पणशीकर यांनी कट्यार मधील पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी शिकविलेला तराणा प्रस्तुत केला. यानंतर त्यांनी राग रागेश्री मधील अभिषेकी बुवांची ‘मोरा मन बस करे लिनो श्याम…’ ही बंदिश व ‘गुंतता हृद्य हे…’ हे पद सादर केले. ‘नामाचा गजर’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. त्यांना निखिल फाटक (तबला), पंडित सुधीर नायक (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाने ( पखावज), सौरभ काडगांवकर (गायन), शुभम खंडाळकर, राधिका जोशी (तानपुरा) अशी साथसंगत केली.

विदयेश रामदासी यांनी प्रास्ताविक केले. दीपक पवार यांनी आभार मानले तर श्रुती निगुडकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.