Loksabha Election : त्यांना कशाकशातून बाहेर काढलं,याची यादी वाचली तर त्यांचे फिरणे अवघड होईल

शरद पवार यांचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे हे माझ्यावर आणि कुटुंबावर वैयक्तिक हल्ले करत आहेत,त्यांची लायकी नाहीये. . . मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही पण ज्याचं नाव तुम्ही घेता त्यांच्या प्रकरणांची यादी वाचली तर त्यांचे जनमानसात फिरणे अवघड होईल असे राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(30 एप्रिल) रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

 

           

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की,शरद पवार यांनी ‘पुलोद’ चं सरकार स्थापन केलं तर त्याला संस्कार म्हणायचे आणि अजित पवार यांनी केले तर गद्दारी म्हणायची. 2017 मध्ये एक बैठक झाली, तो दिवस गणेश चतुर्थीचा होता.. ती बैठक कुठे झाली?कशी झाली?कुणाच्या घरी आणि कोणत्या ठिकाणी झाली? शिवसेनेला बाहेर कसे काढायचं हे कसे ठरलं? तुम्ही केलं ते संस्कार आणि आम्ही केलं तर गद्दारी? अशी टीकेची तोफ राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरदचंद्र पवार गट) यांच्यावर धनंजय मुंडे(Loksabha Election) यांनी डागली होती.

 

Loksabha election : मी भटकती आत्मा आहे, लोकांवरील दुःखाचा डोंगर पाहून अस्वस्थ होतो – शरद पवार

 

धनंजय मुंडे यांच्या टीकेबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही.लहान कुटुंबातला,लहान समाजातला एक होतकरू तरुण समाजासाठी काही करू इच्छितो म्हणून मी त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले, लोकांची नाराजी होती तरी मी लोकांच्या विरोधात जाऊन त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले आणि ते आज मी आणि माझ्या कुटुंबावर हल्ला करत आहेत.त्यांचे जर कारनामे आम्ही बाहेर काढले तर त्यांचे फिरणे अवघड होईल.त्यांनी केलेले उद्योग मी सध्या भाष्य(Loksabha Election) करू इच्छित नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.