Accident : बसची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी

एमपीसी न्यूज –  वाहनाला ओव्हरटेक करताना एसटी बसने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर(Accident) वाकी गावात घडली.
भीमा शिवराम बारणे (वय 70, रा. दोंदे, ता. खेड), लक्ष्मीबाई भीमा बारणे अशी जखमींची नावे आहेत. भीमा बारणे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बस (एमएच 20/जीसी 4502) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Khed : जिलेटिनच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गावरून खेडकडे जात होते. ते वाकी गावच्या हद्दीत समाधान खानावळच्या पुढे आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने एका वाहनाला ओव्हरटेक करताना बारणे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये बारणे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. चाकण पोलीस(Accident) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.