Maval : पाण्यापासून दुरावलेल्या कासवाला जीवदान

एमपीसी न्यूज – पाण्यापासून दुरावलेल्या एका कासवाला पकडून त्याला पाण्यात सोडून देण्यात आले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रविवारी (दि. 28) ही कामगिरी केली.

टाटा धरण परिसरात अजगर असल्याचा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला रविवारी सकाळी कॉल आला. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे, जिगर सोळंकी, दक्ष काटकर यांनी टाटा धरणाकडे धाव घेतली. मात्र यांना पोहोचण्यासाठी(Maval) थोडा वेळ लागल्याने अजगराने धूम ठोकली.

 

Pune : ‘दगडूशेठ’ गणपतीला 50 लाख मोगऱ्याचा पुष्पनैवेद्य

 

त्यानंतर परिसरात भटकत असताना पाण्यापासून लांब अंतरावर कोरड्या वातावरणात एक मोठा कासव आल्याचे अनिल आंद्रे, जिगर सोळंकी, दक्ष काटकर यांनी पाहिले. त्यांनी कासवाला पकडून पाहणी केली असता ते लीथ्स सॉफ्टशेल प्रकारचे कासव होते. हे कासव स्वच्छ पाण्यात राहते. त्यामुळे त्याला धरणाच्या पाण्यात सोडण्यात आले. धरणाच्या पाण्यात सोडताच कासवाने देखील धरणात(Maval) धूम ठोकली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.