Talegaon : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने दिले दोन श्वानांना जीवदान

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील बनेश्वर मंदिराजवळ असलेल्या विहिरीमध्ये पडलेल्या दोन श्वानांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने जीवदान दिले. विहिरीत पडलेल्या श्वानांना संस्थेच्या सदस्यांनी बाहेर काढले. 

 

याबाबत माहिती अशी की, तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर मंदिराजवळ जुनी विहीर आहे. या विहिरीत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यात रविवारी (दि. 28) सकाळी श्वानाची दोन पिले पडली. त्यांना विहिरीतून(Talegaon) वरती चढता येत नव्हते.

 

याबाबत माजी नगरसेविका शोभा भेगडे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला माहिती दिली. त्यानुसार संस्थेच्या सदस्यांनी(Talegaon) विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत शिडी टाकून दोन्ही पिलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यातील एका श्वानाच्या पोटात मार लागला आहे. त्या श्र्वानाची तपासणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.