Nigdi : टेम्पो चालकाने केला साडेचार लाखांच्या मालाचा अपहार 

एमपीसी न्यूज – चिंचवड येथून बेंगलोर येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या ( Nigdi ) मालाची टेम्पो चालकाने परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 23 ते 25 एप्रिल या कालावधीत अजंठानगर, चिंचवड ते कोल्हापूर या दरम्यान घडला.

सुरेश सिताराम बंडगर (वय 52, रा. धाराशिव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजी नेताजी काकडे (वय 36, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : आळंदीमध्ये वारकरी सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश बंडगर फिर्यादी यांच्या टेम्पो (एमएच 14/जेएल 0479) वर चालक म्हणून काम करतो. अजंठानगर चिंचवड येथून टेम्पोमध्ये चार लाख 60 हजार 373 रुपये किमतीचा माल भरून दिला. हा माल बेंगलोर येथे पोहोचवायचा होता. टेम्पो चालक सुरेश बंडगर याने चिंचवड ते कोल्हापूर दरम्यान टेम्पोतील मालाची परस्पर विल्हेवाट लावून फिर्यादी यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत ( Nigdi ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.