Alandi : आळंदीमध्ये वारकरी सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ

 एमपीसी न्यूज –  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी देवाची आयोजीत ( Alandi ) वारकरी  सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ आज दि.28 रोजी भक्त निवास (श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान) आळंदी येथे झाला.या शिबिराचे उद्घाटन डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबिर 5 मे पर्यंत दररोज सकाळी साडे आठ ते दुपारी बारा यावेळेत सुरू असणार आहे.  
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पितांबर लोहार (सकाळ उपसंपादक) , उमेश बागडे (शिबिर अध्यापक ) ,भीमसेन महाराज शिंदे (शिबिर अध्यापक), राजेंद्र वैद्ये, श्रीधर सरनाईक, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, अभिषेक कुऱ्हाडे देवस्थान कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

संत परंपरा वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर वारी हा महाराष्ट्राचा अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आहे.भावी पिढीला हा वारसा शास्त्र शुद्ध पद्धतीने मिळावा यासाठीश्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी श्री क्षेत्र आळंदीतील लहान मुलांसाठी हे उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे.

 

यामध्ये संत चरित्र ,हरिपाठ,टाळ वादनाचे प्रशिक्षण अभंग परिचय व गायन ,व्यक्तिमत्व विकास – (तज्ञांचे मार्गदर्शन),ध्यान व श्रीमद भगवद्गीता 15 वा अध्याय हे विषय शिकवले जाणार आहेत.या शिबिरातील मुलांना देवस्थान तर्फे अल्पोहर व दुपारी सात्विक भोजन प्रसादाची सुविधा देण्यात आली ( Alandi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.