Alandi : निष्ठावान विरुद्ध गद्यार अशा पध्दतीने या निवडणुकीकडे पाहिली पाहिजे – राजेश टोपे

 एमपीसी न्यूज – ही निवडणूक कशा पध्दतीने पाहिली पाहिजे तर निष्ठावान (Alandi )विरुद्ध गद्यार . निष्ठावान लोकांची किंमत आपण करणार की नाही?  अमोल कोल्हे हे निष्ठावान आहेत. शिरूरचे आमदार निष्ठावान आहे. निष्ठेची किंमत जनता करणार का? हे या निवडणुकीतून सिद्ध होणार आहे. निष्ठावान हा विजयी झालाच पाहिजे ,या दृष्टिकोनाची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे राजेश टोपे म्हणाले.काल ( दि.9 रोजी )  शिरूर लोकसभा मतदार संघ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ राजेश टोपे यांचे आगमन झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी  राजेश टोपे म्हणाले,  84 वर्षाचे  योद्धा असलेले शरद पवार कशा  पध्दतीने काम करत आहे ,याची  तुम्हाला आम्हाला प्रेरणा मिळत आहे. डॉक्टर असलेल्या  अमोल कोल्हे यांनी  कोरोना काळात आम्हाला खूप मदत केली .   ते ॲक्टर आहेत, ते लीडर आहेत, संसद रत्न उत्कृष्ट वक्ते आहेत. ते एक बहुआयामी असे व्यक्तिमत्त्व आहे. अश्या व्यक्तिमत्वास निवडून आणले पाहिजे .

 

Talegaon Dabhade : मावळ तालुक्यात मतदानाची तयारी पूर्ण

 आळंदी  पाणी प्रश्न संदर्भात टोपे म्हणाले,  आळंदीला भामा आसखेडचे पाणी कमी मिळत आहे. आम्ही लक्ष देऊ त्यांना सांगू , ते करूनच घेऊ.याकडे लक्ष देऊन ते काम करून घेऊ.या भागाला प्रश्न मुक्त ,अडचण मुक्त आळंदी व देहू परिसर ठेवू.

तसेच ते म्हणाले राजकारण, निवडणूक ,प्रतिनिधी कश्यासाठी आहेत? त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून (Alandi ) आणला पाहिजे.लोकांच्या अडचणी आपण सोडवू शकलो पाहिजे. यासाठी चे राजकारण व समाजकारणाचा विषय असतो.त्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक येत्या काळात करूया.
शरद पवार व्यक्ती नसून एक विचार आहेत. त्यांनी आयुष्य पूर्ण वेचले ते एका विचारासाठी वेचले.तो विचार म्हणजे शिव शाहू आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचे काम केले.जातीवाद ,धर्मवाद यासाठी त्यांनी काम केले नाही.सर्वधर्मसमभाव  घेऊन आयुष्यभर काम केले. विकासाच काम केले आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच हित जपलं पाहिजे असे त्यांचे राजकारण राहिले आहे.या विचारला फाटा देऊन कोण दुसरीकडे जाऊ पाहत असेल तर त्यांनी त्या विचारला विरोध केला.
 आज या निवडणुकीत कोणत्या कारणा मुळे इकडून तिकडे जात आहेत. काय कारणाने शिवसेना फोडतात ,काय कारणाने राष्ट्रवादी फोडतात .सत्तेचा दुरपयोग करून हे केलेले आहे. सुप्रिया ताई प्रत्येक भाषणात म्हणतात ice . I फॉर इन्कम टॅक्स ,c फॉर सीबीआय ,e फॉर ईडी या तीन संस्था स्वातंत्र्यापासून आहेत. देशाचं संविधान झालं तेव्हा पासून आहे त.याचा गैरवापर होत नव्हता.सत्तेचा गैरवापर करून घर गड्या सारखं राबवण्याचे काम हे सध्याचे भाजप सरकार करत आहे.त्या विचाराला व प्रवृत्तीला आपला विरोध आहे. या शस्त्राचा उपयोग आपली संस्था पक्ष फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.नैतिकतेला विरोध नाही.त्यावेळी महाभारत झाले सर्व गोष्टी झाल्या,धर्म विरुद्ध अधर्म ,सत्य विरुद्ध असत्य,नैतिकता विरुद्ध अनैक्तिकता यामध्ये नेहमी सत्याचा,धर्माचा,नैतिकतेचा विजय झाला आहे.
भाजप कोणत्या नैतिक अधिकाराने मतदान मागत आहे?  त्यांनी ज्या पद्धतीने 2014, 2019 मध्ये सांगितले,  2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ,तुमच्या खात्यात 15 लाख टाकू ,आम्ही अशी नीती आणू खर्च झाला असेल त्यापेक्षा 50 टक्के नफा राहिला पाहिजे. शेतीचे धोरण आणू. ही त्यांची आश्वासने आहेत त्यांची पुरती होताना दिसत नाही.पेट्रोल, डिझेल गॅस महागले आहे. शेतकरी खते महागली आहेत.
 तसेच टोपे यांनी सांगितले नीरव मोदी, मल्या व इतर यांची 11.80 लाख कोटी कर्ज माफ केले.व त्याबाबत संबंधित सविस्तर माहिती येथे देण्यात आली.तसेच मनमोहसिंग यांनी जेव्हा चार्ज सोडला तेव्हा देशावर 50 हजार लाख कोटींचे देशावर कर्ज होते .आता ते 2 लाख कोटी झाले आहे.चारपट वाढ झाली आहे. दरडोई दीड लाख कर्ज माणसांवर आले आहे, हे मोदींनी भाषणात कधी सांगितले नाही. आढळराव यांनी पक्ष बदलला या धोरणाबाबत त्यांनी टीका केली.
 यावेळी शिरूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच बैठकीपूर्वी राजेश टोपे  यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे (Alandi ) दर्शन घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.