Talegaon Dabhade : मावळ तालुक्यात मतदानाची तयारी पूर्ण

390 केंद्रांवर होणार मतदान, 3 लाख 73 हजार 408 मतदार ,3 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान होणार ( Talegaon Dabhade)  आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ तालुका हा महत्त्वाचा मानला जातो. तालुक्यात तळेगाव,लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत असा शहरी तर बहुसंख्या ग्रामीण भाग आहे. तालुक्यात 390 मतदान केंद्र असून या ठिकाणी 3  लाख 73 हजार 408  मतदारांना मतदान करण्यास संधी आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मतदान प्रक्रियेसाठी तीन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 204 मावळ विधानसभा मतदारसंघ तथा मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Talegaon : पोलीस उपनिरीक्षकाने हटकल्याने चोरट्याने केला गोळीबार

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत नवले बोलत होते. 204 मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार 3 लाख 73 हजार 408 असून त्यापैकी 1 लाख 91 हजार 762  पुरुष तर 181693 स्त्री मतदार आहेत व 13 तृतीयपंथी मतदार आहेत. यामध्ये 390 मतदान केंद्र असून त्यासाठी सुमारे तीन हजार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी कार्यरत आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात 45 झोन करण्यात आले आहेत. यावर नियंत्रणासाठी सेक्टर ऑफिसरची नेमणूक केली आहे. आत्तापर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन वेळा प्रशिक्षण घेण्यात ( Talegaon Dabhade)  आले आहे, असे नवले यांनी सांगितले आहे.

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध व अपंगांसाठी व्हील चेअरची व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रावर एक प्रमुख अधिकारी व इतर तीन सहायक अधिकारी, एक कर्मचारी व बंदोबस्तासाठी एक पोलीस अशा सहा जणांची प्रत्येक केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्करची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदानाच्यासाठी 137 वाहनांना जीपीएस लावून तयार ठेवली आहे. मतदान केंद्रासाठी लागणारे सर्व साहित्याचे वाटप नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन इंजिनिअरिंग कॉलेज येथून होणार आहे.मतदान सोमवारी (दि .13) रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे. मतदानाच्या वेळी 200 मीटरच्या आत कोणीही प्रवेश करू नये अशा सूचना देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या आहेत

वाढत्या उष्णतेमुळे विशेष खबरदारी

वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचाराची व्यवस्था केली आहे. उन्हामुळे मतदारांना त्रास झाला तर घ्यावयाची खबरदारी याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

*एक्झिट पोलला बंदी*

जनमत चाचणी, मतदारांचा कौल (एक्झिट पोल) याबाबतीत बंदी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे जाहीर करू नये असा आदेश आहे. बंदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला. शनिवारी (दि .11) सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता ( Talegaon Dabhade)  होईल.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.