Talegaon : पोलीस उपनिरीक्षकाने हटकल्याने चोरट्याने केला गोळीबार

एमपीसी न्यूज – कॉलनीमध्ये संशयितपणे फिरत असल्याचे दिसल्याने पोलीस उपनिरीक्षकाने एकाला   (Talegaon )  हटकले. त्यावरून चोरट्याने थेट गोळीबार करत आपल्या साथीदारासह पळ काढला. ही घटना तळेगाव दाभाडे मधील मस्करनेस कॉलनी मध्ये गुरुवारी (दि. 9) घडली. हे चोरटे बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी आले होते.

 

देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्याजवळील काॅलनीत पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शाम शिंदे हे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे गुरुवारी काॅलनीत आले होते. त्यावेळी काॅलनीतील एका बंद बंगल्याच्या बाहेर एक संशयित व्यक्ती आढळून आली. संशयिताने चेहऱ्याला मास्क लावला होता. त्यामुळे उपनिरीक्षक शिंदे यांनी त्याला हटकले. ‘‘तू कोण आहेस, येथे कशासाठी आलास, कोणाकडे आलास, कोणाला भेटायचे आहे,’’ असे शिंदे यांनी संशयिताला विचारले.

Chinchwad : थेरगाव स्ट्राँग रूम परिसरातील वाहतुकीत बदल

 

त्याचा राग येऊन संशयित व्यक्तीने त्यांना उर्मट उत्तरे दिली. ‘‘ए चल तू तेरा काम कर, मै अलग टाईप का इन्सान हू, असे संशयित व्यक्ती म्हणाला. त्यानंतरही उपनिरीक्षक शिंदे यांनी त्याच्याकडे विचारणा   (Talegaon  ) केली. त्यावेळी संशयिताने त्याच्या खिशातील पिस्तूल दाखवले. त्यामुळे शिंदे यांनी आरडाओरडा केला. ‘‘चोर आले चोर आले,’’ असे म्हणून शिंदे यांनी काॅलनीतील इतर लोकांना बोलावले. त्यांचा आवाज ऐकून बंगल्याच्या आत असलेला एक चोरटा बाहेर आला. भिंतीवरून उडी मारून तो आणि बाहेर थांबलेला त्याचा एक साथीदार असे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून पळून जात होते. त्याचवेळी काॅलनीतील काही जण तेथे आल्याने दुचाकीवरील संशयिताने त्याच्या पिस्तूलातून एक गोळी जमिनीवर झाडली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून भरधाव निघून गेले.

 

चोरटे दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

 

चोरट्यांनी काॅलनीतील बंद बंगल्याच्या सेफ्टी डोअरचे कुलूप हेक्साने कापून तोडले. त्यानंतर कटावणीच्या साह्याने मुख्य दरवाजाचे लॅचलाॅक उचकटून बंगल्यात प्रवेश केला. मात्र, त्यांचा चोरीचा डाव  (Talegaon ) उधळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.